पहिली भारतीय विनाइंजीन ट्रेन सेवेस सज्ज !

नवी दिल्ली: विनाइंजीन पहिली भारतीय ट्रेन तयार झाली असून 29 तारखेला तिची चाचणी घेण्यात येणार आहे. ही अतिवेगवान (हाय स्पीड) ट्रेन संपूर्णपणे भारतीय बनावटीची असून मेक इन इंडिया मोहिमे अंतर्गत तिची निर्मिती करण्यात आलेली आहे. ताशी सुमारे 160 किमी वेगानी जाणारी ही ट्रेन सन 2018 मध्ये तयार झाल्याने तिला “ट्रेन 18′ असे नाव देण्यात आले आहे. अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून “ट्रेन20′ तयार करण्यात येत आहे. ही सन 2020 मध्ये सेवेत रुजू होणार आहे.

ट्रेन 18 तयार करण्यसाठी चेन्नई कोच फॅक्‍टरीला 18 महिने लागले आहेत, अशाच प्रकारच्या विदेशी ट्रेन्सपेक्षा हिची किंमत निम्मी असल्याचे सूत्रांनी सांगितले. या ट्रेनला लोकोमोटिव्ह इंजीन नाही, त्या ऐवजी प्रत्येक डब्याला लावलेल्या ट्रॅक्‍शन मोटर्समुळे ही ट्रेन रुळांवरून धावणार आहे. नेहमीच्या ट्रेन्सपेक्षा हिला प्रवासासाठी 20 टक्के कमी वेळ लागणार आहे. या ट्रेनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही दोन्ही बाजूने धावू शकणार आहे. ड्रायव्हर केबिनमधील मॅनेजमेंट सिस्टिममुळे पायलट ब्रेक्‍स आणि डब्यांच्या दरवाजांचे नियंत्रण होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

78 प्रवासी बसू शकणारे 14 नॉनएक्‍झेक्‍युटिव्ह आणि 56 प्रवासी बसू शकणारे 14 नॉनएक्‍झेक्‍युटिव्ह डबे या ट्रेनला जोडण्यात येणार आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)