“पहिला येईल, त्याला पहिली संधी’ या तत्त्वानुसार वकिलांना येरवडा जेल येथे आरोपींची मुलाखत घेता येणार

वकील, येरवडा प्रशासनातील वाद मिटला


शुक्रवारी येरवडा जेल प्रशासन आणि पुणे जिल्हा बार असो. शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेत काढला तोडगा

पुणे – येरवडा जेल प्रशासन आणि वकिलांमधील वाद मिटला आहे. रांगा न लावता जो पहिला येईल, त्याला पहिली संधी, त्यानंतर क्रमाने येणाऱ्यांना, त्या क्रमांकानुसार आरोपीची मुलाखत घेता येणार आहे. येरवडा प्रशासन आणि पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत शुक्रवारी हा तोडगा काढण्यात आला. दरम्यान बार असोसिएशनने मुलाखतीच्या ऑनलाईन नोंदणीचा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावावर विचार करण्याचे आश्‍वासन यावेळी देण्यात आले.
बारचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे-दांगट, सचिव ऍड. संतोष सितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, खजिनदार ऍड. प्रताप मोरे, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, कार्यकारिणी सदस्य ऍड. रमेश राठोड, ऍड. पंजाबराव जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. शाहिद अख्तर, माजी उपाध्यक्ष ऍड. हेमंत झंजाड, ऍड. राहुल देशमुख आणि ऍड. प्रीतेश खराडे उपस्थित होते. गुरूवारी (दि.5 ऑक्‍टोबर) येरवडा जेल येथे आरोपीची मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या वकिलांमध्ये वाद निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी दुपारी वकिलांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी येरवडा जेल अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामध्ये हा तोडगा काढण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)