पहा श्रीमंत दगडूशेठ गणपतीसाठी पीएनजीने बनविलेली ज्वेलरी (फोटो फिचर)

पुणे -श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने भाविकांनी सढळ हाताने आणि श्रद्धेने अर्पिलेल्या सोन्यातून 40 किलो वजनाचे सुवर्ण अलंकार बनविण्यात आले आहेत.

पीएनजी ज्वेलर्स तर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी ही विशेष ज्वेलरी तयार करण्यात आली आहे. या विशेष ज्वेलरीमध्ये साडेनऊ किलो वजनाचा रत्नजडित सुवर्ण मुकुट, 7 जाळ्या, सातशे ग्रॅम वजनाचे सुवर्ण शुंडाभूषण, सूर्यकिरणाचा आभास निर्माण करणारे दोन किलो वजनाचे सुवर्ण कान, तब्बल 4 हजार सुवर्ण फुलांच्या नक्षीपासून तयार करण्यात आलेला सुवर्णपोषाख, साडेतीन किलो वजनाचे सुवर्ण-रत्नजडित उपरणे, साडेसहा किलो वजनाचे सोवळे आणि पांढऱ्या रत्नांचे कोंदण असलेला एक किलो वजनाचा सुवर्ण हार, प्रभावळ यांचा समावेश आहे.

या दागिन्यांमध्ये सोने व मौल्यवान रत्नांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व दागिन्यांवर 40 कारागिरांनी 5 महिने कलाकुसर केली आहे, अशी माहिती पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ, कारागीर शरणकुमार रतकलकर यांनी आज पत्रकाराशी बोलतांना दिली.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)