पहाटेचा गारठा कायम राहणार

राज्यभरात गुलाबी थंडी सक्रीय : पुणे 14 अंशांवर

पुणे – उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह दक्षिणेकडे येऊ लागल्याने राज्यात गारठा वाढला आहे. गुरूवारी सर्वांत नीचांकी तापमान जळगावमध्ये 13 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यातही किमान तापमान 13.7 अंश सेल्सिअस होते. राज्यात शनिवारपर्यंत मुख्यत: कोरडे हवामान राहणार असून पहाटेच्या वेळी गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने व राज्यात सर्वत्र हवामान कोरडे असल्याचे गारठा वाढला आहे. सकाळच्या वेळात गार वारे वाहत आहेत. त्यामुळे दुपारच्या तापमानातही घट झाली आहे. कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पुण्यातसुद्धा कमाल 32 अंशापर्यंत घसरले.

राज्यात अनेक ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. विदर्भात किमान तापमानाचा पारा 11. 6 ते 15.8 अंश, मराठवाड्यात 12.4 ते 15.4 अंश, मध्य महाराष्ट्रात 12 ते 18 अंश आणि कोकणात 19.3 ते 20.5 अंशांच्या दरम्यान आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या तापमानातही घट होत आहे. पुढील काळात थंडी आणखी वाढणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)