पसरणी घाटात मद्यपी युवकांवर कारवाई

वाई, दि. 9 (प्रतिनिधी) – वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात पहिल्या वळणावर संरक्षक कठड्यावर सार्वजनिक ठिकाणी रविवारी रात्री साडेआठच्या दरम्यान विना परवाना दारू पीत बसलेल्या पाच जणांवर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या आदेशावरून सहायक पोलिस निरीक्षक बी. बी. येडगे व पोलिस कर्मचारी यांनी ताब्यात घेऊन संबंधितांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्सटेबल ओंकार गरूड यांनी फिर्याद दिली आहे
महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटन स्थळाला राज्यासह, जगातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मोठ्या प्रमाणावर रहदारी असणाऱ्या पसरणी घाटात व पायथ्याच्या परिसरात उघड्यावर दारू पिणाऱ्या मद्यपींची मुजोरी वाढली होती. याविषयी अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाजही उठविला होता. दरम्यान, पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांनी कारवाई करून अतुल सोनावणे, ब्राम्हणशाही, नितीन मोरे, रविवार पेठ, विक्रम माने , रविवार पेठ विलास अंकुशे, काशीकापडी झोपडपट्टी, संजय सपोनिशी, काशीकापडी झोपडपट्टी वाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिस कॉन्सटेबल हणमंत दडस, पोलिस नाईक संतोष ञिंबके, हवालदार कृष्णा पवार आदींनी भाग घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)