पसरणी ग्रामपंचायतीत वीस वर्षाच्या सत्ताधाऱ्यांना धक्का

पसरणी ः हात उंचावून अभिवादन करताना पसरणी विकास आघाडीचे कार्यकर्ते व नवनिर्वाचित सदस्य.

तरुणांनी दिली पसरणी विकास आघाडीला साथ : हेमलता गायकवाड सरपंचपदी
पुरोगामी विचारांच्या राजकारणाला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा
वाई, दि. 7 (प्रतिनिधी) – पसरणी (ता. वाई) येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्यासरपंच पदाच्या निवडणुकीत नवतरुण विकास आघाडी पसरणी, व पसरणी विकास आघाडी यांच्या तुल्यबळ लढत होवून एक मतानी पसरणी विकास आघाडीच्या सौ. हेमलता गायकवाड यांनी बाजी मारली. वीस वर्षे सत्ताकारणात असलेल्या आघाडीवर मात केली. यावेळी सदस्य सौ. कविता मांढरे, सौ. नीता जमदाडे, मधुकर कोचळे, हरीभाऊ सुतार, प्रवीण दाहोत्रे, दीपक सणस यांची प्रमुख उपस्थिती होती.
पसरणी गावात दीर्घकाळ राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. परंतु गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पसरणी गावातील सर्वसामान्य जनता व तरुण वर्ग यांनी पसरणी विकास आघाडी स्थापन करून प्रस्थापितांना शह दिला. त्यावेळी या पसरणी विकास आघाडीने तुल्यबळ टक्कर दिली. यात काही उमेदवारांचा निसटता पराभव झाला. त्यावेळी ग्रामपंचायतीत नवतरुण विकास आघाडीचे दहा सदस्य तर पसरणी विकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले.तेरा सदस्य असणाऱ्या बलाढ्य ग्रामपंचायतीत नवतरुण विकास आघाडीचा सरपंच झाला. गावातील पसरणी विकास आघाडी कोणत्याही पक्षांची नसून तरुणांची व सर्व सामान्य जनतेची व पुरोगामी विचारांची स्थापन करण्यात आली आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत नवतरुण विकास आघाडीचा कारभार समाजाभिमुख न झाल्याने त्यांच्या गटातील अनेक जण नाराज झाले होते. याचा फायदा घेत पसरणी विकास आघाडीने नाराजांना आपल्या गटात सामील करून घेतले. विरोधकांचे चार उमेदवार फोडण्यात पसरणी आघाडीला यश मिळाले. झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पसरणी विकास आघाडीचा सरपंच करून विरोधकांवर मात केली आहे. मतदारांनी दोन वेळा सौ. हेमलता गायकवाड यांना बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले आहे. पसरणी गावाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने एका सर्वसामान्य समाजातील महिलेला सरपंच पदी निवड झाली आहे. तसेच 2020 साली होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून निवडून जाणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीची ही एक नांदी असल्याचे राजकारणातील जाणकारांचे मत आहे. पसरणी गावाच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आरपी आयचे जिल्हाध्यक्ष-अशोकराव गायकवाड यांच्या पत्नी सौ. हेमलता गायकवाड यांची निवड होणे म्हणजे ही पुरोगामी विचारांची ऐतिहासिक नांदी आहे. पसरणी विकास आघाडीचे अजय मांढरे, बाजीराव(भाऊ) महांगडे, माजी पंचायत समिती सदस्य- राजेश शिंदे, स्वप्नील गायकवाड, विनायक मोझर, बाजीराव (नाना) महांगडे,प्रदीप महांगडे पसरणी विकास आघाडी स्थापन करून गावला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहे. एका अजेंड्याखाली राहून गावाचा विकास करणार असल्याचेही नूतन सरपंच सौ.हेमलता गायकवाड यांनी सरपंचपदी निवड झाल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना त्यांनी जाहीर केले. ही आघाडी पुढील राजकारणात पसरणी गावासह तालुक्‍याच्या राजकारणात वेगळे अस्तित्व दाखविणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
पसरणी च्या सरपंच पदाच्या निवडणुकीत रामचंद्र पवार यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर तलाठी- गजानन घाडगे, ग्रामसेवक- शिवाजी दरेकर यांनी त्यांना सहाय्य केले. या निवडणुकीसाठी गावातील ग्रामस्थांनी विषेश परिश्रम घेतले. यामध्ये राजेंद्र येवले, राजेंद्र गायकवाड, दीपक महांगडे, आनंदा कुंभार, संजय कांबळे, विजय शिर्के, संपत महांगडे, सुरेश शिर्के, हिंदुराव महांगडे, दत्तात्रय महांगडे, हरिभाऊ शिर्के, दौंड मामा, संपत जमदाडे, दादा येवले, शंकर शिर्के. सुरेश कांबळे, हरि (नाना) शिर्के, अजित महांगडे, देवानंद काकडे, रवींद्र महांगडे, रमेश येवले, विक्रांत महांगडे, प्रभाकर गायकवाड, राजेंद्र मांढरे, विक्रम पवार, प्रकाश प्रभाळे, राजू दाहोत्रे, मधुकर भिसे, प्रतिक गायकवाड, रमेश गायकवाड यांचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)