पसरणीच्या प्रकाशची वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशीपसाठी निवड

वाई – येथील पॅरामोटर एक्‍सपर्ट प्रकाश चिवे या तरुणाची थायलंड (बॅंकॉक) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय 10 व्या वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या वेगळ्या टॅंडम पॅराट्राईक साहस प्रकारासाठी भारतातील सहा स्पर्धकांमध्ये प्रकाशचा समावे आहे. भारतातील प्रसिध्द ऍरो क्‍लब ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने फेडरेशन ऍरोनॉटीक इंटरनॅशनल (एफएआय) संस्थेअंतर्गत भरविण्यात येणाऱ्या या स्पर्धा यंदा थायलंद येथे 27 एप्रिल ते 6 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहेत. या साहसी खेळप्रकारात स्पर्धकांना विविध 15 टास्क पूर्ण करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. यातील विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात येणार आहे.

प्रकाश चिवे यांनी यापूर्वी नागपूर, औरंगाबाद, आसाम, तेलंगाना, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथे झालेल्या साहसी क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली होती. तर नागपूर व औरंगाबाद येथील स्पर्धेत बक्षीसे पटकाविली होती. मागील दहा वर्षाचा या क्षेत्रातील अनुभव लक्षात घेवून एसीआय या संस्थेने त्यांची या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली आहे.

सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर हे वेगळे क्षेत्र निवडून चिवे यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांना या स्पर्धेसाठी इंडीगो एअरलाईनचे हैद्राबाद येथील वैमानिक प्रफुल्लराज सिंग यांनी प्रायोजित केले आहे. या क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करुन आपल्या देशाचे व पसरणी गावाचा नावलौकिक वाढविण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे चिवे यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)