पसरणीकर फाऊंडेशन ही विधायक कार्य करणारी प्रेरणादायी संस्था

डॉ. घोरपडे : पसरणी येथील फाऊंडेशनच्या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
वाई, दि. 30 (प्रतिनिधी) – पसरणीकर फाऊंडेशनच्यावतीने पसरणी परिसरात वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असून समाजाप्रती असणारी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा अग्रक्रमाने प्रयत्न करण्यात येतो. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालापयोगी वह्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांप्रती असणारी आपुलकी यातून स्पष्ट होते. पसरणीकर फाऊंडेशन ही विधायक कार्य करणारी प्रेरणादायी संस्था आहे असे उद्‌गार वाई रोटरी क्‍लबचे अध्यक्ष डॉ. दतात्रय घोरपडे, यांनी पसरणी व परिसरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप कार्यक्रमात बोलताना काढले. पसरणी प्राथमिक शाळा व परिसरातील राजेवाडी, माल्कम पेठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन पसरणीकर फौंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. घोरपडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास येवले, सरपंच सौ.सुरेखा महांगडे, राजेंद्र शिर्के, सुनील महांगडे, सुरेश शिर्के, संतोष चौधरी, चंद्रकांत कायंगुडे, नंदकुमार ढगे, गणपत गायकवाड, सौ. उषा महांगडे, सौ. निर्मला रांजणे, पसरणी कर फौंडेशन चे सर्व सदस्य, यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. घोरपडे म्हणाले, पसरणी कर फौंडेशन ही सध्या ग्रामीण भागातील शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी चांगली संस्था असून गेल्या तीन वर्षात या संस्थेने पसरणी गावांसह परिसरात भरीव उपक्रम राबविले आहेत. यासंस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील गरजू लोकांना व गरजू विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य लाभले आहे. असेही ते म्हणाले. संस्थेचे मार्गदर्शक किशोर येवले व रोटरीचे मदनकुमार साळवेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक लक्ष्मण मराठे यांनी केले. सूत्रसंचालन केशव कोदे यांनी केले तर यावेळी या कार्यक्रमास चारही शाळांचे मुख्याद्यापक, शिक्षक, विद्यार्थी, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)