पसंती क्रमांकातून मिळाले पावणेबारा कोटी

पिंपरी – नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांसाठीच्या पसंती क्रमांकातून जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांमध्ये 11 कोटी 83 लाख 50 हजार रुपये इतका महसूल उपप्रादेशिक कार्यालयाच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे.

आवडीचा वाहन क्रमांक घेणाऱ्यांमध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. त्यासाठी जादा पैसे मोजण्याची तयारीही वाहन मालक दाखवत आहे. काही दुचाकी मालकही आवडीच्या नंबरसाठी जादा पैसे मोजतात. या आकर्षक नंबरसाठी 20 ते 30 हजार रुपये ते खर्च करतात. हौसेला मोल नसते या उक्‍तीप्रमाणे वाहनचालकांच्या हौसेपोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल आरटीओमध्ये जमा होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑक्‍टोबर (दसरा) आणि नोव्हेंबरमध्ये (दिवाळी) सर्वाधिक महसूल जमा झाला आहे. ऑक्‍टोबरमध्ये 1 कोटी 76 लाख 58 हजार 500, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये 1 कोटी 10 लाख 79 हजार 500 इतका महसूल चॉईस नंबरमधून जमा झाला आहे. ऑक्‍टोबर महिन्यामध्ये 2054 जणांनी चॉईस नंबरसाठी अर्ज केला होता. जानेवारी महिन्यामध्ये कमी म्हणजे 56 लाख 92 हजार 500 रुपये महसूल जमा झाला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)