पश्‍तून युवा नेत्यामुळे पाकिस्तान जेरीस

पेशावर (पाकिस्तान) – पश्‍तून ताहफूज आंदोलनाचा युवा नेता मंजूर पश्‍तीन याने पाकिस्तान सरकारला जेरीस आणले आहे. हा 25 वर्षे वयाचा नेता आणि पश्‍तूनच्या रक्षणासाठी त्याने चालवलेले पश्‍तून ताहफूज आंदोलन यांच्यापुढे पाकिस्तान सरकारने हात टेकले आहेत. गेल्या दहा वर्षात अतिरेक्‍यांविरुद्धच्या कारवायांमध्ये जे लोक गायब झालेले आहेत त्यांना न्यायालयासमोर पेश करून कायदेशीर कारवाई करावी याकरता त्याने जोरदार आंदोलन छेडले आहे. त्याचे हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी पाकिस्तान सरकार करत असलेल्या सर्व प्रकारच्या जुलूम-जबरदस्तीला न जुमानता हे आंदोलन वेगाने जोर पकडत आहे.

हजारो लोक यात सहभागी होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कराचीत एका कबायली युवकाच्या एन्काऊंटर नंतर हे आंदोलन सुरू झाले. एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्याला अटक करावी अशी त्यांची प्राथमिक मागणी होती. पण नंतर या आंदोलनाची व्याप्ती वाढतच गेली. खैबर पख्तुनवा आणि वजीरीस्तानमध्ये यासाठी जोरदार आंदोलने चालू आहेत. मंजूर पश्‍तीन याची भाषणे ऐकण्यासाठी लोक प्रचंड संख्येने जमा होत आहेत. पाकिस्तानी सेनाच अतिरेक्‍यांना प्रोत्साहन देत असल्याचा मंजूर पश्‍तीनचा आरोप आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)