पश्‍चिम विभागाचा दणदणित विजय 

23 वी गुणता आश्वासन महानिदेशालाय (डीजीक्‍यूए) इंटर झोनल टेबल टेनिस व कॅरमप्रतियोगीता 

पुणे: खुले एकेरी संघ सामन्यांमध्ये पश्‍चिम विभागाने 3-0 ने बढत ठेऊन उत्तर विभागाचा दणदणीत पराभव करत येथे सुरु असलेल्या 23 वी गुणता आश्वासन महानिदेशालाय (डीजीक्‍यूए) इंटर झोनल टेबल टेनिस व कॅरमप्रतियोगीतेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

यावेळी टेबल टेनिसच्या पहिल्या सामन्यात पश्‍चीम विभागाच्या रोनीत ढालीने उत्तर विभागाच्या भंडारीचा 11/1, 11/6, 11/8 असा पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात पश्‍चिम विभागाच्या संदीप कांबळेने उत्तर विभागाच्या अजय त्रिपाठीचा 11/7, 11/4, 11/8 असा पराभव करत आगेकूच केली. यावेळी झालेल्या अखेरच्या सामन्यातही पश्‍चीम विभागाने बाजी मारली यावेळी पश्‍चिम विभागाच्या अजय पाटीलने उत्तर विभागाच्या मिथिलेशचा 11/6, 11/4, 11/6 असा पराभव करत पश्‍चीम विभागाअल विजय मिळवून दिला.

इतर सामन्यांचा सविस्तर निकाल – 
दक्षिण विरूद्ध पूर्व विभाग – कुंथल(दक्षिण) विरूद्ध राजकुमार (पूर्व) – 11/6,11/8,11/8, विंसेंट (पूर्व)विरूद्ध हाजरा (दक्षिण) -11/8,11/8,11/4, कुंथल (दक्षिण) विरूद्ध विंसेंट (पूर्व)- 14/12,13/11,08/11, 14,12. पाठक (दक्षिण) विरूद्ध रतनकुमार (पूर्व) – 05-11, 11-04, 04-11,11-09, 14-12.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)