पश्‍चिम महाराष्ट्रावर सरकारकडून अन्याय

कराड- भाजप सरकार सत्तेत येवून तीन वर्षे झाली. त्यांच्याकडून केवळ खोट्या आश्‍वासनांची खैरात सुरू आहे. चुकीची आणि आडमूठी धोरणे सरकार राबवत आहे. त्यातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. विंग, ता. कराड येथील संपर्क बैठकीत ते बोलत होते.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, शिवाजी पाटील, सुभाषराव पाटील, सरपंच धनाजीराव पाटील, निवासराव शिंदे, विठ्ठल राऊत अनिल माळी, आबासाहेब खबाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. शंकरराव खबाले यांनी स्वागत केले. अधिकराव गरुड यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)