पश्‍चिम महाराष्ट्राला हुडहुडी

File Pic

पारा 10 अंशांवर : थंडी आणखी वाढणार

पुणे – उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमान सरासरीखाली आले आहे. नाशिक येथे हंगामातील नीचांकी 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुणे, साताऱ्यात तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत घसरल्याने थंडी वाढली आहे. बुधवारपासून राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, गारठा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विदर्भात दोन-तीन दिवसांपासून पावसाला पोषक हवामान होते. मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये काही भागात हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाला पोषक हवामान निवळल्यानंतर आकाश निरभ्र होऊ लागले आहे. तसेच किमान तापमानात घट होऊन, गारठा पुन्हा वाढू लागला आहे.

छत्तीसगड आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) असल्याने पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात गारठा वाढला असून, किमान तापमान पुन्हा सरासरीच्या खाली उतरले आहे.

पुण्यातील तापमानात मोठी घट झाली असून बुधवारी पारा 10.5 अंशांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे दिवसासुद्धा बोचरी थंडी जाणवत आहे. रात्रीच्या तापमानात तर मोठी घट झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)