पश्‍चिम महाराष्ट्रात दोन एप्रिलपासून राष्ट्रवादीचा “हल्लाबोल’

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.29 – मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पश्‍चिम महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या दोन एप्रिलपासून कोल्हापूर येथील आई महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन या आंदोलनाला सुरुवात होणार असून, 12 एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा समारोप होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

पुण्यात गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये या हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, माजी आमदार कमल ढोले-पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, विलास लांडे, आमदार दत्तात्रय भरणे, जयदेव गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तो पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरले पाहीजे. केवळ झेंडे घेऊन मोर्चात सहभागी होवून उपयोग नाही तर मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला आणि तरूण यांना समावून घेणे आवश्‍यक आहे. संघर्ष यात्रा ही आपली परिक्षा आहे. त्याचा परिणाम अगामी निवडणुकांवर होणार असून, कार्यकर्त्यांनी स्वत:मधील मरगळ झटकून कामाला लागावे.

अजित पवार म्हणाले, यवतमाळ ते नागपूर, तुळजापूर ते औरंगाबाद, श्रीगोंदा ते नाशिक असे तीन टप्प्यात हल्लाबोल आंदोलन यशस्वीपणे झाले. आता 2 एप्रिलपासून पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात आंदोलन होणार आहे. त्यामध्ये 10, 11 आणि 12 एप्रिल हे तीन दिवस पुणे जिल्ह्यात आंदोलन होणार असून, पुणे शहरातील खडकवासला, वडगावशेरी, भोसरी आणि पिंपरी येथे प्रत्येकी एक सभा तर अन्य तालुक्‍यात 6 असे एकूण 10 सभा होणार आहेत.
…………….
यांना स्वत:ची ताकदच माहित नाही – अजित पवार
“आम्ही वाघ, सिंह आहोत, हे मुख्यमंत्र्यांना म्हणावे लागते. परंतू, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना हे सांगायला लागत नव्हते. बाळासाहेब असताना मोठ मोठे नेते मातोश्रीवर जायचे. मात्र, आज वाघाचा बछडा मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात आणि मुख्यमंत्री त्यांना भेटत नाही. त्यामुळे गप गुमान मातोश्रीवर यावे लागते. त्याचवेळी शिवसेनेच्या लोकांनी आवाज टाकला असता की, “मुख्यमंत्री साहेब आमचा नेता येऊन बसला आहे. भेटला नाही तर पाठिंबा काढून घेऊ’ एवढ म्हटले असते तरी मुख्यमंत्र्यांची पळता भोई झाली असती. मात्र, आपल्या हातात किती पॉवर आहे हेच माहीत नाही. त्यामुळे ही अवस्था झाल्याचा टोला अजित पवार यांनी सत्ताधिकाऱ्यांना लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)