पश्‍चिम बंगाल मधील आमची यात्रा कोणीच अडवू शकत नाही – अमित शहा 

नवी दिल्ली: पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय प्रचारासाठी रथयात्रा काढणे हा आमचा अधिकार असून आम्हाला या यात्रा काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय रथयात्रा काढण्यास तेथील सरकारने अनुमती नाकारली होती.

राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात भाजपने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली होती तथापी त्यांना तेथेही न्याय मिळू शकला नाही. राज्यात हिंसाचार होण्याची शक्‍यता असल्याने कलकत्ता उच्च न्यायालयानेही भाजपला तेथे रथयात्रा काढण्यास अनुमती दिली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर अमित शहा यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. ते म्हणाले की आम्ही या यात्रा रद्द केलेल्या नाहींत. त्या केवळ काही काळापुरत्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

-Ads-

आम्हाला तेथे यात्रा काढण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने तेथे राजकीय कार्यकर्त्यांवर दहशत माजवली असून विरोधी पक्षाचे कार्यकर्ते तेथे दिवसाढवळ्या मारले जात आहेत असा आरोप त्यांनी केला. त्या राज्यातील प्रशासनही पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पश्‍चिम बंगाल मधील सारे प्रशासन तृणमुल कॉंग्रेसच्या दबावाखाली आहे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)