कोलकाता – काही दिवसांपुर्वी कोलकात्यात मजेऱ्हात येथे पूल कोसळण्याची घटना घडल्यानंतर पश्‍चिम बंगाल मध्ये पुन्हा एक तशीच घटना सिलिगुडी जिल्ह्याच्या फानसीदेवा भागात घडली आहे. या ठिकाणच्या पुलावरून एक ट्रक जात असताना हा पुल मधोमध कोलमडून पडला. त्यावरून जाणारा ट्रक तेथेच अडकून पडला असून या प्रकारात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेच्या संबंधात प्रतिक्रीया देताना उत्तर बंगाल विकास मंत्री रविंद्रनाथ घोष यांनी सांगितले की या पुलावरून ट्रक आणि अन्य जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असतानाही तेथून ही वाहतुक होत होती त्यातूनच ही घटना घडली आहे. हा पूल खूप जुना आहे तथापी त्याच्या उभारणीच्या संबंधातील कागदपत्रे सध्या उपलब्ध नाहीत.

मोडकळीला आलेल्या या पुलाच्या दुरूस्तीची मागणी सरकारकडे अनेक वेळा करण्यात आली आहे पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)