पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचारात तीन ठार

बरसात – पश्‍चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील अमडंगा ब्लॉक मध्ये पंचायत मंडळ स्थापन करण्याच्या विषयावरून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली त्यात तीन जण ठार झाले तर अन्य दहा जण जखमी झाले आहेत.

दोन्ही गटांनी एकमेकांवर बॉंब फेकले आणि गोळीबारही केला. ठार झालेल्यांपैकी दोन जण तृणमुल कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत तर एक जण मार्क्‍सवादी कम्युनिस्टपक्षाचा कार्यकर्ता आहे. तृणमुल कॉंग्रेसचे पंधरा कार्यकर्ते यात जखमी झाले आहेत अशी माहिती तृणमुलच्या स्थानिक नेत्यांनी दिली.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून मात्र कोणतीही माहिती मिळू शकली नाहीं. याच विषयावरून पश्‍चिम बंगालच्या उत्तर दिनजापुर, मालडा, आणि पुरूलिया या जिल्ह्यांमध्ये याच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. त्यात चार जण जखमी झाले असून अन्य अनेक जण जखमी झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)