पश्‍चिम बंगालकडून पेट्रोल-डिझेल 1 रुपया स्वस्त

कोलकाता: राजस्थान, आंध्र प्रदेशपाठोपाठ आज पश्‍चिम बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंधनाच्या दरात 1 रुपया कपात केली आहे. यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत येथे एक रुपयाने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करताना ममता बॅनर्जी यांनी वाढत्या इंधन दरावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात आतापर्यंतच्या दरात ही सर्वोच्च दरवाढ आहे. यामुळे महागाईचा भडका उडत असून सर्वसामान्य नागरिकांना झळ बसत आहे. यामुळेच राज्यातील जनतेला दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1 रूपया कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार पेट्रोलियम उत्पादनांवरील उपकर कमी करू शकते. मात्र, केंद्राकडून कोणत्याही प्रकारे उपाययोजना करण्यात येत नाही. याबाबत केंद्राने पुर्नविचार करत वाढत्या दराबाबत ठोस पाउल उचलावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पेट्रोल-डिझेलवरील वॅट चार टक्‍क्‍यांनी कमी केला. ज्यामुळे दर अडीच रुपये प्रति लिटर एवढे कमी झाले. त्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायुडू यांनीही आंध्रवासियांना दिलासा देत पेट्रोल-डिझेल दोन रुपये प्रति लिटरने स्वस्त केले. आता पश्‍चिम बंगाल सरकारनेही आपल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. परभणीत पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे राज्य सरकार नागरिकांना दिलासा कधी देणार याकडे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)