पश्‍चिम घाटातील एकवीस प्रकारच्या प्रजाती धोक्‍यात

-खाणकाम व प्रदूषणामुळे
-पश्‍चिम शुद्ध पाण्याच्या स्रोतांवर परिणाम

संदीप राक्षे
सातारा – खाणकाम व प्रदूषणामुळे पश्‍चिम घाटातील शुद्ध पाण्याच्या स्रोतांवर आधारित परिसंस्था व एकवीस प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती धोक्‍यात आल्या आहेत. नुकत्याच एका सर्वेक्षणामध्ये ही ताजी बाब समोर आली आहे . पश्‍चिम महाराष्ट्र हे जैवविविधतेने अतिसंपन्न क्षेत्र आहे.सहा राज्य आणि महाराष्ट्राचे दहा जिल्हे असा विस्तार पश्‍चिम घाटाचा विस्तार पश्‍चिम किनारपट्टीला समांतर आहे . तेथे विकासकामांचे नियोजन करताना शुद्ध पाण्याच्या स्रोतांचा व वन्य प्रजातींच्या रक्षणाचा विचार होणे गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिकार, राखीव वनक्षेत्रे आणि वन्यजिवांबाबत अनेक कायदे तसेच अधिसूचना केल्याचे इतिहासात डोकावताना आढळते. त्यांची प्रेरणा घेऊन जरी आपण आज काही नियम पाळले तरी जैवविविधता टिकण्यास मदत होईल. पश्‍चिम घाटातील वन्यजिवांचे संवर्धन व्हायचे असेल तर जंगलांचे, सड्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यामुळे या परिसरातून उगम पावणाऱ्या नद्या आणि पाण्याचे स्रोत यांचे संवर्धन होईल.अनेक संरक्षित ठिकाणे ही शुद्ध पाण्याच्या स्रोतांजवळ असली तरी तेथील जैवविविधता धोक्‍यात आली आहे. कृषी व औद्योगिक प्रदूषणामुळे अनेक प्रजाती धोक्‍यात आल्या आहेत. निवासी व व्यावसायिक विकास, धरणे व ऊर्जानिर्मिती, खाणकाम यांमुळे शुद्ध पाण्याच्या स्रोतांमधील प्रजातींवर परिणाम झाला आहे.

पश्‍चिम घाटात पर्वतीय परिसरात 50 टक्के जंगले नष्ट झाली आहेत व नंतर तिथे अतिक्रमणे व जंगलतोड सुरूच राहिली. पश्‍चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यामध्ये जवळजवळ 325 प्रजाती जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्‍चिम घाटातच आढळतात. ही रांग वन्य जिवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीच्या जंगल क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात.

ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थाने आहेत. कर्नाटकातील पश्‍चिम घाटात 6000 पेक्षा जास्त हत्ती आढळतात व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी 10 टक्के वाघसुद्धा इथेच आहेत. अजगराच्या काही जाती या फक्त पश्‍चिम घाटातच आढळतात. तसेच अनेक विषारी व बिनविषारी प्रकारचे सरपटणारे प्राणीही येथेच आढळतात. या सर्वांचे संवर्धन व्हायचे असेल तर जैवविविधता वाचवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.

पश्‍चिम घाटाला वाचवण्याची गरज

-तीस वर्षापूर्वी पश्‍चिम घाटामध्ये 67 % वनसंपदा,
-आता वनसंपदा 48 % टकक्‍यावर
-घाटात साडेचार हजार वनस्पतींच्या प्रजाती
-311 वनस्पती केवळ पश्‍चिम घाटातच सापडतात.
-पैकी 98 वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर
-1750 सरपटणारे प्राणी, भूजलचरांचीही संख्या मोठी
-पश्‍चिम घाटात 120 नदयांचा उगम, या नद्यांवर दोन हजार धरणे
-हायड्रो इलक्‍ट्रिक प्रोजेक्‍टमुळे वीजनिर्मिती
-आगामी वीस नव्या प्रकल्पांमुळे तब्बल 26 लाख झाडांची कत्तल


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)