पश्‍चिमेकडचे पाणी गोदावरीत आणा

परजणे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
कोपरगाव – महाराष्ट्राच्या पश्‍चिम घाटमाथ्यावरील समुद्राला जाऊन मिळणारे पावसाचे पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील पाणी प्रश्न सोडविण्याबाबत बाळासाहेब
विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र पाणी परिषदेने सरकारकडे पाठविलेला प्रस्ताव अद्यापही प्रंलबित आहे. भविष्यातील पाण्याचे भीषण संकट लक्षात घेऊन या प्रस्तावातील कामे मार्गी लावावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्रातील वर्तमान आणि भविष्यातील पाण्याच्या संकटाचा पाणी परिषदेने सखोल अभ्यास केला. गोदावरी, तापीसह महाराष्ट्रातील इतर खोऱ्यांतील पाण्याच्या उपाययोजना कमीत कमी खर्चात कशा पद्धतीने करता येऊ शकतील, याबाबतचे अभ्यासपूर्ण प्रस्ताव सरकारला वारंवार सादर केले होते.
पश्‍चिम घाटमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. तेच पाणी
पूर्वेकडे वळविण्यासाठी एक बोगदा तयार करण्याची गरज आहे. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व देवेंद्र फडणवीस या तीनही मुख्यमंत्र्यांनी पाणी परिषदेच्या या प्रस्तावाची दखल घेवून तातडीने उपाययोजना करण्याचे सूतोवाच केले होते; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सरकार रेल्वे, रस्ते आणि बोगदे खोदण्यासाठी निधी उपलब्ध करून देते. मग घाटमाथ्यावरील कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यत वळविण्यासाठी निधी नसल्याची सबब का पुढे करते, असा प्रश्‍न परजणे यांनी केला.
राज्यातील कृष्णा खोऱ्याचे नियोजन केले जाते. मग गोदावरी आणि तापी
खोऱ्यातील पाण्याचे नियोजन करताना सरकार उदासिनता का दाखवते, असा सवाल करून ते म्हणाले, की राज्यात दिवसेंदिवस धरणांची संख्या वाढत चालली आहे; मात्र त्याप्रमाणात सिंचनाचे क्षेत्र मात्र वाढलेले नाही. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट राज्यात निर्माण झालेले आहे. पाण्याअभवी शेती उद्‌ध्वस्त झाली आहे. शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसायदेखील मोडकळीस आलेला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. ऐन पावसाळ्यात खेडोपाडी पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची वेळ आलेली आहे. शिर्डी संस्थानने इतरत्र निधी
देण्याऐवजी गोदावरी खोऱ्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निधीची उपलब्धता केली असती, तर
नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना या अवर्षणप्रवण जिल्ह्यातील पाण्याचे संकट
कायमस्वरुपी दूर झाले असते. फडणवीस यांच्याकडे न्याय व विधी खाते आहे, तर
नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा खात्याचा कार्यभार आहे. या दोघांनीही आपले राजकीय
वजन पाठपुरावा केला, तर गोदावरी खोऱ्यातील पाणी समस्या नक्कीच सुटेल.
बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाणी परिषदेने सादर केलेला प्रस्ताव
प्रत्यक्षात कृतीत आणल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या आणि उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याच्या प्रश्‍नात आपण जातीने लक्ष घालावे, अशी मागणी परजणे यांनी मोदी यांच्याकडे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)