पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी पुकारलेला बंद पूर्णत: फसला

कोलकाता : सामान्यांच्या जीवनमानावर कोणताही परिणाम न होता राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरू राहिल्याने डाव्यांच्या आघाडीने पश्चिम बंगालमध्ये पुकारलेला सहा तासांचा बंद पूर्णत: फसला. खासगीसह सरकारी बस आणि मेट्रोच्या वाहतुकीवर बंदचा कोणताही परिणाम झाला नाही.

पुढील महिन्यात होणाऱ्या पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकशाहीची गळचेपी झाल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ डाव्यांच्या आघाडीने राज्यभरात बंद पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘रेल्वे वेळापत्रकानुसार धावत होत्या; तर नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरून विमानांचे उड्डाण वेळेत झाल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. शैक्षणिक संस्थाही बंद काळात सुरू होत्या. कोलकता विद्यापीठात सीबीएसईच्या परीक्षाही नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ब्रत्य बसू यांनी डमडम मतदारसंघातील परिस्थितीचा शुक्रवारी सकाळी आढावा घेतला. ते म्हणाले, ‘लोकांचे दैनंदिन जीवन शांततेत आणि नियमित सुरू होते. ते नेहमीसारखे घराबाहेर पडत होते. राज्यात कोणताही बंद पाळण्यात आलेला नाही.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)