पशूधनासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका देणार

राजगुरुनगर- राज्यात माणसांप्रमाणे पशूधनासाठी (जनावरांसाठी) अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.जेणेकरून शेतकऱ्यांच्या पशूधनावर उपचार करणे सोपे जाईल. त्यासाठी शासनाकडून भरगोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजगुरुनगर येथे दिली.
राजगुरुनगर येथील लघु पशू चिकित्सलय इमारत उद्‌घाटन, त्यातील “क्ष किरण यंत्र उद्‌घाटन व 20 वी पशू गणना कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज (शनिवारी) करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार बाळा भेगडे, तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पशुचिकित्सा आयुक्त डॉ शीतलकुमार मुकणे, पशुधन आयुक्त डॉ अमिम शेख, शिवाजी विधाटे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, भाजपचे राजन परदेशी, पांडुरंग ठाकूर, रामदास धनवटे, जयसिंग एरंडे, विष्णू बोऱ्हाडे, कालीदास वाडेकर, माऊली वाफगावकर, प्रदेश सदस्या संगीता जगताप,पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा क्रांती सोमवंशी, तालुका अध्यक्षा रुपाली परदेशी, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, नगरसेवक सचिन मधवे, संपदा सांडभोर, रेखा क्षोत्रीय, मनोहर सांडभोर राहुल आढारी यांच्यासह सर्व नगरसेवक, शेतकरी,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले की, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना शेती पुरक व्यवसायासाठी मदत दिली पाहिजे. शेतीपूरक व्यवसायासाठी सरकाराच्या माध्यमातून पाहिजे ती मदत देण्यात येईल. गो माता आणि गोरक्षण करणे आपली जबाबदारी व कर्तव्य आहे. सरकारला याचे महत्त्व कळले आहे. मागील वर्षापासून गो-शाळांसाठी व त्यांच्या रक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी निधी दिला. जिल्ह्यात साडेतीनशे पशू वैद्यकीय दवाखाने आहेत. खेड तालुक्‍यात 29 दवाखाने आहेत. शास्त्र फार पुढे गेले आहे. जनावरांसाठी क्ष-किरण मशीन उपलब्ध झाल्या आहेत म्हणून माफक दरात तपासण्या कराव्यात.

  • राजगुरुनगर शहरासाठी चास कमान धरणातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असून पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. याबरोबरच शहरातील अनेक रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. शहरात भुयारी गटार योजना प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी आहे. हा प्रस्ताव मंजूर करावा. नमामी चंद्रभागा योजना शहरात राबविण्यासाठी भुयारी गटार झाले पाहिजे. शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न भीषण आहे तो सोडविण्यासाठी जवळपासच्या गावात क्षपणभूमीसाठी जागा लवकर मिळाल्यास शास्रोक्तर प्रकल्प राबविण्यात येईल.
    – शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरुनगर
  • पशुधन राष्ट्रीय पशुधन योजनाअंतर्गत पोषण मूल्य वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पशुपालकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न आहे. ऑनलाईन पशू गणना देशात सुरू होणार आहे त्याची सुरुवात आज झाली आहे. या माध्यमातून पशूधनपालकांना सेवा देता येणार आहे.
    – डॉ. शीतलकुमार मुकणे, पशूचिकित्सा आयुक्‍त, पुणे जिल्हा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
14 :thumbsup: Thumbs up
45 :heart: Love
6 :joy: Joy
25 :heart_eyes: Awesome
35 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)