मुख्य खजिनाच्या व्यतिरिक्त सुक्ष्म तत्वांचा सुध्दा पशु आहारात कमी मात्रामध्ये समावेश असणे आवश्यक आहे. कारण सुक्ष्म खनिजे हे शरीराच्या विभिन्न आवश्यक क्रियांचे सहज संपादनासाठी आवश्यक आहेत. सुक्ष्म खजिनजाच्या कमतरतेमुळे जनावरे विविध आजारांना बळी पडू शकतात व त्यांच्या उत्पादनावरही विपरीत प्रभाव पडू शकतो. देशाच्या विविध भागानुसार जनावरांच्या चाऱ्यात सुक्ष्म खनिजांची उपलब्धता कमी जास्त होत असते. जनावरांना योग्य प्रमाणात आहार मिळेत असूनही जर शारिरीक वाढ व उत्पउदनात कमतरता, लंगडणे इ. लक्षणे आढळल्यास एक किंवा अधिक खनिज तत्वांची कमतरता आहे.
रक्तांचे आजार शरीरात लोह, तांबे व कोबाल्टची कमतरतेची लक्षणे आहेत. खनिजांचे स्त्रोत्र : जनावरांच्या आहारता खजिनजांची मात्रा आणि आवश्यकता बऱ्याच कारणांवर अवलंबुन असते. जसे माती, सिंचनाचे पाणी व उर्वरक इ. कारणांमुळे खनिज पोषण समस्या ही एक क्षेत्रीय समस्या होते. कधी-कधी औद्योगिक क्षेत्रामुळे पाणी प्रदुषित होते व जनावरांच्या आहारातील एक घटक होऊन जाते ज्यामुळे खनिज विषमता होऊ शकते. साधारणत: अल्प, तंतुमय खाद्य आणि धान्यात कॅल्शियमची मात्रा कमी असते. परंतु शेंगावर्गीय चाऱ्याच्या बियाणे व शेंगांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. याच प्रकारे शेंगावर्गीय चाऱ्याच्या तुलने अशेंगावर्गीय चाऱ्यात कॅल्शियमचे प्रमाण कमी आढळते.
तसेच धान्यामध्ये फॉस्फोरस विपुल प्रमाणात असते. गव्हाच्या कोंड्यामध्ये फॉस्फरससह मॅगनिज सुध्दा विपुल प्रमाणात आढळते. हाडांचा चुरा (इवदम उमंस), मासळ्यांचा चुरा इ. हे सुध्दा खनिजांचे मुख्य स्त्रोत आहेत. साधारणत: आजही शेळ्या-मेंढ्यांना चराईवर अवलंबुन रहावे लागते. कधी-कधी चराईद्वारे सुध्दा खनिजांच्या आवश्यकतेची पूर्तता होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे शारिरीक वाढ व गाभण जनावरांकरीता अतिरिक्त खजिजांची आवश्यकता निर्वाह रेशनापेक्षा 25 ते 50 टक्के अधिक असते. करीता जनावरांच्या अल्प मिश्रणात 2 टक्के प्रमाणे खनिज मिश्रण मिसळतात व चरणाऱ्या जनावरांमध्ये खनिज मिश्रणाच्या विटा गोठ्यात बांधतात ज्यामुळे जनावरे आवश्यकतेनुसार या विटा चालतात.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा