सातारा – पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

रविवार दि.9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आयोजित मेंढीपालक मेळावा व मेंढ्यांचे आरोग्य शिबीरास उपस्थिती. स्थळ : काळेवाडी (दहिवडी) ता. माण. दुपारी 12 वाजता सातारा जिल्हा पशुसंर्धन विभाग आयोजित महिलांसाठी शेळी पालन प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटनास उपस्थिती.

दुपारी 2 वाजता दहिवडी येथून म्हसवड मार्गे पळसावडे कडे प्रयाण. 3.30 वाजता श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वाजता पळसावडे येथून कुर्डुवाडी जि. सोलापूरकडे प्रयाण.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)