पशुसंवर्धन एक शेतीपूरक व्यवसाय, विविध योजना (भाग दोन)

पशुसंवर्धनातून रोजगार ही संकल्पना प्राधान्याने स्त्रियांसाठी पुढे येते. ही संकल्पना राबविताना पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने त्यांच्या विविध पशुपालनाच्या योजनांमध्ये स्त्री लाभार्थीना 30 टक्के प्राधान्य दिले आहे. नेहमीच्या रुळलेल्या वाटांपलीकडे जाऊन काही तरी करण्याची ऊर्मी जोर धरत असताना त्यात शिक्षित तरुणीही मागे नाहीत.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे स्त्रियांचा कल वाढतो आहे. या पाश्वभूमीवर शेतीपूरक व्यवसाय म्हणून ज्या ज्या गोष्टींकडे पाहिले जाते त्यात पशुसंवर्धनातून रोजगार ही संकल्पना प्राधान्याने पुढे येते. ही संकल्पना राबविताना पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने त्यांच्या विविध पशुपालनाच्या योजनांमध्ये स्त्री लाभार्थीना 30 टक्के प्राधान्य दिले आहे.

-Ads-

पशुसंवर्धन विभागाकडून काही जिल्हास्तरीय योजनांची अंमलबजावणीदेखील केली जाते. यामध्ये जिल्हास्तरीय अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना दोन दुभत्या जनावरांचे गट वाटप योजना, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकडील पशुधनासाठी दुभत्या जनावरांच्या भाकड काळासाठी खाद्यपुरवठा योजना, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धनविषयक प्रशिक्षण, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना शेळी व बोकड अशा जनावरांचे गटपद्धतीने वाटप, एकात्मिक कुक्कुट विकास योजना, राज्यातील गाई तसेच म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम, कामधेनू दत्तक ग्राम योजना, वैरण विकास योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे. कुक्कुट पालन शेड, शेळी पालन शेड, गायी तसेच म्हशींसाठी गोठयात पक्के तळ, गव्हाण, मूत्रसंचय टाक्‍या, पूरक खाद्य यांसारखे काम मनरेगाअंतर्गत करता येते.

जिल्हास्तरीय योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमार्फत होते. जिल्हास्तरीय योजनेचे काही लाभार्थी हे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून तर काही लाभार्थी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत निवडले जातात. योजनेसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा लागतो.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत काही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविल्या जातात. यामध्ये वैरण बियाणे उत्पादन- संकलन आणि वितरण योजना, वनक्षेत्र नसलेल्या नापिक जमिनी-गायरान जमिनी-गवत कुरण क्षेत्रातून वैरण उत्पादन योजना, हस्तचलित कडबा कुट्टी यंत्रासाठी प्रोत्साहन योजना, मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करणे, उच्च क्षमतेच्या वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट स्थापन करणे, लहान क्षमतेचे ट्रॅक्‍टरला जोडता येणारे वैरणीच्या विटा तयार करण्याचे युनिट, गवताचे गठ्ठे तयार करण्याचे मशीन तसेच वैरण कापणी यंत्राचे वितरण योजना, पशुखाद्य कांडी व पशुखाद्यनिर्मिती केंद्राची स्थापना, बायपास प्रोटीन उत्पादन केंद्राची स्थापना, परसातील कुक्कुट पालन यांचा समावेश आहे.

  फारुक  तडवी 
 डॉ. उल्हास गायकवाड 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)