पशुपालकांना उच्च दर्जाचे पशुधन उपलब्ध करुन देणार

मुंबई : देशी गायी, म्हशींच्या वंशावळ सुधारण्याच्या कामाला राज्य शासनाने गती दिली असून आगामी काळात पशुपालकांना उच्च दर्जाच्या आणि दर्जेदार तसेच अधिक दूध उत्पादन क्षमतेच्या गायी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ताथवडे येथील कॅटल फार्ममध्ये 600 पशुंची जोपासना करता येईल असे गोठे बांधण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी 46 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या ठिकाणी सध्या 95 म्हशी संगोपनासाठी घेण्यात आल्या आहेत. पशुंच्या प्रजनन कालावधीनंतर अधिक पशु घेण्यात येणार आहेत. लष्कराच्या गायीदेखील या गोठ्यासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. हा गोठा अत्यंत आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार असून  संपूर्णत: तांत्रिक पद्धतीने जोपासना केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)