पवित्र पोर्टलवर प्रोफाईल अद्ययावत करण्यास मुदतवाढ

पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर उमेदवारांना वैयक्‍तिक माहिती (प्रोफाईल) स्वप्रमाणित करण्यासाठी 8 ते 11 जानेवारी दरम्यान लॉगइनवर सुुविधा उपलब्ध करून देण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

पवित्र पोर्टलवरील प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. बहुसंख्य उमेदवारांना पोर्टलवर लॉगइन ओपन होत नसल्याने माहिती अद्ययावत करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये. तसेच माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी, विद्या प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुनील मगर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांच्याकडे करण्यात आली होती. काही उमेदवारांनी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडेही निवेदन पाठविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षण विभागाने उमेदवारांच्या तक्रारींची दखल घेत विविध माहिती अद्ययावत करण्यासाठी पोर्टलवर मुदतवाढ देऊन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग बदलण्यासाठी केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वैयक्‍तिक लॉगइनला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जात संवर्ग, नॉन क्रिमीलेयर, डोमेसाईल याबाबतची माहिती भरण्याची अथवा बदलण्याची सुविधा 4 ते 6 जानेवारी दरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी 5 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत पोर्टलवरील अर्ज स्वप्रमाणित केले असतील अशाच उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलण्यासाठी लॉगइनवर संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता या विविध मुदतवाढीनंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. याबाबत उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)