पवित्रा रेड्डी, आर्या पाटील, साहिल तांबट यांचे सनसनाटी विजय 

एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा 
पुणे – मुलींच्या गटात पवित्रा रेड्डी व आर्या पाटील यांनी, तर मुलांच्या गटात साहिल तांबटने मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवताना एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पाचगणीतील रवाईन हॉटेल यांच्यातर्फे एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या गटात कोल्हापूरच्या आर्या पाटीलने नवव्या मानांकित व कर्नाटकाच्या हिने लक्ष्मी गौडाचा 6-1, 6-2 असा पराभव धडाकेबाज विजय मिळवला. पवित्रा रेड्डीने अकराव्या मानांकित भूमिका त्रिपाठीचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. पाचव्या मानांकित शरण्या गवारेने सुहिता मारुरीला 6-3, 6-1 असे पराभूत केले.

-Ads-

मुलींच्या गटांतील अन्य लढतीत सातव्या मानांकित भक्ती शहाने रेश्‍मा मारुरीला 6-2, 6-2 असे नमविले. तसेच तिसऱ्या मानांकित संजना सिरीमुल्लाने अपूर्वा वेमुरीवर 6-4, 6-0 अशा फरकाने विजय मिळवीत आगेकूच केली. मुलांच्या गटात साहिल तांबटने सोळाव्या मानांकित शशांक नरडेचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6 (2) असा पराभव केला.
दुसऱ्या मानांकित सुशांत दबस याने पात्रतावीर दक्ष अगरवालचा 6-3, 6-3 असा पराभव केला. सातव्या मानांकित आर्यन भाटियाने रोनिन लोटलीकरचे आव्हान 6-1, 6-0 असे मोडीत काढले. आठव्या मानांकित सर्वेश बिरमाणे याने फरहान पत्रावालाचा 6-4, 6-3 असा पराभव करून तिसऱ्या फेरीत धडक मारली.

सविस्तर निकाल – 
16 वर्षांखालील मुली – दुसरी फेरी – सृजना रायराला (1) वि.वि. कोटिस्था मोडक 6-3, 6-3; श्रेया चक्रवर्ती (15) वि.वि. श्रेष्ठा पी 6-2, 6-4; पवित्रा रेड्डी वि.वि. भूमिका त्रिपाठी (11) 6-4, 6-4; भक्ती शहा (7) वि.वि. रेश्‍मा मारुरी 6-2, 6-2; संजना सिरीमुल्ला (3) वि.वि. अपूर्वा वेमुरी 6-4, 6-0; आर्या पाटील वि.वि.लक्ष्मी गौडा (9) 6-1, 6-2; शरण्या गवारे (5) वि.वि. सुहिता मारुरी 6-3, 6-1; नैशा श्रीवास्तव (8) वि.वि. वेदा रनाबोथु 6-2, 6-2;
16 वर्षाखालील मुले – दुसरी फेरी – उदित गोगोई (1) वि.वि. ऋषिकेश संगदाहल 6-2, 6-1; अर्जुन कुंडू (13) वि.वि. रिकी चौधरी 6-4, 6-4; अमन तेजाबवाला (12) वि.वि. रोहन कुमार 7-5, 6-3; नितीन सिंग (6) वि.वि.अरविंद प्रेमराजू 6-2, 6-4; क्रिश पटेल (4) वि.वि. एरिक निथीलन 6-2, 6-0;
चेतन गडियार (14) वि.वि.अनंत मुनी 6-2, 6-2; आदित्य बलसेकर (11) वि.वि. धनुश पटेल 6-2, 6-1; आर्यन भाटिया (7) वि.वि. रोनिन लोटलीकर 6-1, 6-0; सर्वेश बिरमाणे (8) वि.वि.फरहान पत्रावाला 6-4, 6-3; हीरक वोरा (9) वि.वि. साहेब सोधी 6-3, 6-3; साहिल तांबट वि.वि. शशांक नरडे (16) 6-3, 7-6 (2); सुशांत दबस (2) वि.वि.दक्ष अगरवाल 6-3, 6-3.
———————–

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)