पवित्रचे अर्ज भरण्याची आणखी एक संधी

पुणे – शिक्षक भरतीसाठी सुरु करण्यात आलेले पवित्र पोर्टलवर राज्यभरातील जवळपास दीड लाख शिक्षकांनी अर्ज केले आहेत. हे अर्ज करण्यासाठी गेले महिनाभर टप्प्याटप्याने सर्वांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र अद्यापही जर काही काही शिक्षकांचे अर्ज भरायचे राहिले असतील तर त्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. तसेच शिक्षकांनी अर्ज भरताना काही चूका केल्या असतील तर त्यांनाही आता शासनाकडून ती चूक सुधारण्याची संधी दिली जाणार आहे.
राज्यात येत्या काळात जवळपास अठरा ते वीस हजार जागांसाठी शिक्षक भरती होणार आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता देखील आहे. त्यामुळेच 2012 पासून बंद असलेली शिक्षक भरती अखेर सुरु झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. यासाठी टप्प्याटप्याने जे अर्ज भरले जात होते त्या काळात नोंदणी झालेल्या शिक्षकांना तांत्रिक अडचणी तसेच घरच्या समस्यांमुळे अर्ज करता आला नाही अशांना ही संधी दिली जाणार आहे. सध्या 12 सप्टेंबरपर्यंत आधीचे अर्ज भरणे प्रक्रिया सुरु रहाणार असून त्यानंतर याबाबती माहिती पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर दिली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)