पवारांच्या गावात दारुबंदीसाठी गामस्थ आक्रमक

काटेवाडी गावची ग्रामसभा वादळी ः भाजप कार्यकत्यांनी उठवला आवाज

भवानीनगर-गावातील संपूर्ण दारूबंदी झाली पाहिजे, याबाबत ग्रामस्थांनी जोरदार मागणी केल्याने राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता. बारामती) गावची ग्रामसभा वादळी ठरली.
बुधवारी (दि. 28) काटेवाडी गावच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा सरपंच विद्याधर काटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसरपंच संजीवनी गायकवाड, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष एकनाथ काटे, संजय कोंडीबा काटे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष जितेंद्र काटे, सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश काटे, शीतल काटे, दत्तात्रय काटे, स्वप्नील काटे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, पोलीस पाटील सचिन मोरे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी अनेक विषयांवर सभेत चर्चा झाली. त्यात गावातील दारूबंदी बाबत भाजपाचे पांडुरंग कचरे व त्यांचे सहकारी यांनी जोरदार गावातील दारूबंदी बाबत आवाज उठविला.
काटेवाडी गावामध्ये असणारे अवैध दारू धंदे बंद करायचे आहेत, असे आवाहन सरपंच काटे यांनी केल्यावर संपूर्ण गावामध्ये दारूबंदी करा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. या ग्रामस्थांच्या आग्रही मागणीमुळे प्रोसेडिंगला विषय घेणे भाग पडले. गावातील दारूबंदी झाली पाहिजे याबात भाजपाचे पांडुरंग कचरे व त्यांचे सहकारी यांनी आग्रही भूमिका घेतली असून याबाबत कायम पाठपुरावा करणार असल्याचे पांडुरंग कचरे यांनी सांगितले.
वार्ड क्रमांक चार हा दीपनगर भाग येतो. या भागामधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच मासाळवाडी, दीपनगर भागात अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीची सोय नाही. या भागात एखादी व्यक्ती मयत झाल्यास अंत्यविधीसाठी नीरा डाव्या कालव्याच्या बाजूला हा सोपस्कार पार पाडवे लागतात. अशी अवस्था या भागात कित्येक वर्षे निर्माण झालेली आहे; परंतु या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कचरे यांनी केला. ग्रामसभा सकाळी 11 वाजता सुरु झाली व दुपारी अडीच वाजता संपली. या वेळी अनेक विषयांवर चर्चा होऊन ही ग्रामसभा पार पडली,

  • तीन ग्रामसभांमध्ये विषय मांडला तरीही…
    काटेवाडी गावातील दारूबंदी बाबत या अगोदर झालेल्या तीन ग्रामसभांमध्ये हा दारूबंदीचा विषय मांडण्यात आला होता. तरीही यावर काही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याने गावातील अवैध रित्या दारू विक्री केली जात आहे. याबात बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात हि ग्रामस्थांनी गावात दारूविक्री केली जात असल्याबाबत तक्रारी केल्या आहेत.
  • शासनाकडून मासाळवाडी स्मशानभूमी 5 गुंठे जागा मिळालेली असून ती बांधण्यासाठी 5 लाखांचा निधीही मंजूर झालेला आहे. तर दीपनगर येथील स्मशानभूमिसाठी शासनाकडून 5 गुंठे जागा पाटबंधारे विभागाच्या जागेतील मिळालेली असून ती बांधण्यासाठीही 5 लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. दीपनगर, मासाळवाडी भागातील नागरिकांसाठी जीवन प्राधिकरण चे पाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. गरीब कुटुंबासाठी 2 हजार दोन टप्प्यात पैसे भरण्याची सवलत देण्यात आली आहे; मात्र प्रत्येक घरी पत्राद्वारे या योजनेची माहिती सांगूनही नागरिकांनी अनामत रक्कम भरली नाही. जीवन प्राधिकरण योजनेचे हे पाणी असल्याने याचा खर्च येतो. केवळ डिपॉझिट भरले नसल्याने या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करणे शक्‍य नाही.
    -विद्याधर काटे, सरपंच काटेवाडी 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)