पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य ! पण… – उदयनराजे भोसले

मुंबई: साताऱ्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी खासदार उदयनराजे इच्छुक आहेत, असे उदयनराजेंनीच जाहीर केले. मात्र पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे साताऱ्यात नेमके तिकीट कुणाला मिळणार ? शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची मतदारसंघनिहाय बैठक सुरु असून बैठकीत एका गटाने उदयनराजेंना विरोध केला आहे. उदयनराजें ऐवजी रामराजे निंबाळकर यांना खासदारकीचे तिकिट द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे २०१९ सातारा लोकसभा कोण लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
उदयनराजे म्हणाले, बैठकीत मी शरद पवारांचे आशिर्वाद घेतले. लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी इच्छूक आहे. स्थानिक पातळीवरुन मला विरोध नाही. मात्र, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.  दरम्यान, माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. 
 
 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
267 :thumbsup: Thumbs up
241 :heart: Love
8 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
8 :blush: Great
2 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)