पवन मावळात 750 हापूस आंबा रोपांचे मोफत वाटप

पिंपरी-हॅण्ड इन हॅण्ड इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने पवन मावळातील शेतकऱ्यांना 750 हापूस आंबा रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कमाई होऊ शकतो, या हेतूने या रोपांचे वाटप करण्यात आले आहे.
मावळातील वातावरण आंबा रोपांच्या वाढीसाठी पोषक आहे. शेतकऱ्यांना आंबा दर्जेदार रोपे मिळावीत, यासाठी तळेगाव येथील हॅण्ड इन हॅण्ड या संस्थेच्या वतीने ही रोपे देण्यात आली. आढले खुर्द आणि शिरगाव परिसरातील शेतकऱ्यांना तीन ते पाच फूट उंचीपर्यंतची 750 हापूस आंबा रोपे उपलब्ध करुन देण्यात आली. संस्थेच्या वतीने वाटप केलेल्या रोपांबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यानिमित्त काही वर्षातच या परिसरातील शेतकऱ्यांना हापूस आंब्याची मधुर चव चाखायला मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)