पवन मावळच्या बाजारपेठेला बेशिस्तीचे “विघ्न’!

नेतेमंडळींची दादागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा शिस्तीचा बडगा

पवनानगर – चाळीस गावांची बाजारपेठ असलेल्या पवनानगरमध्ये पर्यटक आणि राजकीय नेतेमंडळींच्या बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे. बेशिस्त पार्किंगविरोधात पोलिसांनी मोहिम हाती घेतली असून, वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

पवनानगर ही पवनमावळातील 40 गावांची मुख्य बाजार पेठ आहे. येथे दररोज नागरिकांची ये-जा सुरू असते; त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरीक येत असतात. या बाजारपेठेमध्ये शासकीय रुग्णालय, टपाल कार्यालय, जिल्हा बॅंका, शाळा-महाविद्यालय येथे असल्याने पवनानगर चौक हा कायम गजबजलेला असतो. या चौकामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने 2014 साली अतिक्रमणे हटवून रस्त्याचे 90 मीटर रुंदीकरण केले. मात्र परिस्थिती “जैसे थे’च होती. या रस्त्यावर नागरिकांना वरचेवर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे अनेक तास वाहने अडकून पडतात. या चौकात वाहन चालक वाहने कोठेही उभी करतात. लेनची शिस्त पाळली जात नाही.

राजकीय मंडळी येथे वाहने बेशिस्तपणे येथे पार्क करतात. बेशिस्त पार्किंगमुळे येथील वाहतुकीचा बोजावरा उडाला आहे. पवनमावळमध्ये तुंग तिकोणा, लोहगड, विसापूर, बेडसे लेणी, पवना धरण ही पर्यटनस्थळे आहेत. येथे जाण्यासाठी पवनानगर चौकातून जावे लागते. दुसरा पर्याय नसल्याने येथील वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना करावा लागतो आहे. त्यात पश्‍चिमेकडील गावांना कामशेत मुंबई-पुणे, लोणावळा या मुख्य शहरांकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे.

नियम पायदळी तुडविणाऱ्यांवर कारवाई
पवनानगर चौकात वाहन चालक नियमबाह्य पार्कींग करतात व त्या बेशिस्त पार्किगमुळे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरीक हैराण झाले होते. याचीच दखल घेत लोणावळा ग्रामीणचे पोलीस नाईक एस. एम. शेख, पोलीस शिपाई सुनील गवारे, एस. बी. घारे, दिलीप केंगले, पोलीस हवालदार पालांडे यांनी बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहननांवर व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांनवर कारवाई करण्यात आली. हे कारवाईचे सत्र सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)