तीन वर्षांत 20 हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट 
नवी दिल्ली: पवनचक्‍की निर्मिती क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या सुझलॉन कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षांसाठी अपेक्षित असलेल्या 20 हजार मेगावॅट वीज निर्मितीमधील सुमारे 30 टक्‍क्‍यांचा मिळवण्याचे उद्दिष्ट आखले आहे, अशी माहिती या कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
भारतामधील पवन ऊर्जानिर्मिती क्षेत्रामध्ये सध्या तेजी असून 7 हजार 500 मेगावॅट वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांचा लिलाव झाला असून 10 हजार मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प सध्या लिलाव प्रक्रियेमध्ये आहेत. तसेच याव्यतिरिक्त तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेच्या प्रकल्पांचाही लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती सुझलॉनचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी कीर्ती वगाडिया यांनी दिली.
2021 या आर्थिक वर्षापर्यंत 20 हजार मेगावॅट ऊर्जा प्रकल्पांचा लिलाव होणार आहे. आतापर्यंत लिलाव झालेल्या 7 हजार 500 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पातील 20 टक्‍के वाटा आपल्या कंपनीला मिळाला आहे, अशी माहितीही वगाडिया यांनी दिली. नवीन लिलाव प्रक्रियेमध्ये प्रकल्प निर्मितीचा कालावधी 9 महिन्यांवरून 18 महिने एवढा करण्यात आला असल्यामुळे 2019 या आर्थिक वर्षांमध्ये मोठ्या क्षमतेच्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. या घडामोडींमुळे प्रकल्पांच्या प्रगतीवर मर्यादित कालावधीसाठी परिणाम होणार आहे. मात्र पूर्वीचे लिलाव झालेले प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे तसेच नवीन प्रकल्पांची लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यामुळे 2020 या आर्थिक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा भरभराट सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)