पवना विद्या मंदिर शाळेत गोवर रुबेला लसिकरण मोहिम सुरू

पवनानगर – पवनानगर येथील पवना विद्या मंदिर शाळेतील एकूण 730 विद्यार्थी, विद्यार्थीनीना गोवर, रुबेला लस देण्यात आली. पुणे जिल्हा परिषद सदस्या अलका धानिविले, पवना विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग ठाकर, डॉ. पी. पी. गेंगजे, वैद्यकीय अधिकारी येळसे, शिक्षक प्रतिनीधी वांसती काळोखे, मंजुषा गुर्जर, बापूसाहेब पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

या वेळी लसीकरण करण्यासाठी डॉ. पी. पी. गेंगजे, डॉ. एन. बी. क्षीरसागर, डॉ. बिराजदार, राहुल जाधव, केतन जाधव, कालेकर, कुंभार, नागवडे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे व शाळेचे सर्व शिक्षक यांचे यासाठी योगदान लाभले.
गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 27 नोव्हेंबरपासून राज्यात व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते 15 वर्षे वयोगटातील सुमारे तीन कोटी 38 लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील सुमारे 95 टक्‍के बालकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, ही लस सुरक्षित असल्यामुळे पालकांनी आपापल्या बाळाला लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

-Ads-

लसीकरणाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच पहिल्या दोन आठवड्यांत सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकांद्वारे व बाह्यसंपर्क लसीकरण सत्र राबवण्यात येणार आहे. शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये ज्या बालकांचे या मोहिमेत लसीकरण झालेले नाही, त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)