पवना बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द व्हावा

शेतकऱ्यांच्या अपेक्षा : शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे

पवनानगर – पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंद जलवाहिनीतून नेण्यात येणाऱ्या पाण्यासाठी पाण्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी 9 ऑगस्ट 2011 रोजी पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक शेतकरी जखमी झाले होते. दरम्यान या आंदोलनात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

या प्रकरणात तत्कालीन राज्य शासनाने मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली होती. भाजपा सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे करू व जलवाहिनीचा प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करू, अशी घोषणा केली होती. दोन वर्षांपूर्वी शहिद शेतकऱ्यांच्या स्मारक उभे करण्यात आले. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे होईल, अशी घोषणा सरकार करत होते. मात्र बंदजलवाहिनी कायमस्वरुपी रद्द होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांसह पवना बंद जलावहिनी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर दळवी यांनी व्यक्त केले. ज्ञानेश्‍वर दळवी, पांडुरंग ठाकर, विश्‍वनाथ जाधव, संदीप भुताडा, अनिल तुपे, बबन वर्वे, विठ्ठलदादा घारे, किसन खैरे, एकनाथ टिळे, अंकुश पडवळ, सचिन मोहिते अशा अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्‍त केला.

राज्य शासनाने गुन्हे मागे घेतल्याने पोलिसी अत्याच्याराचा चांगल्या मार्गाने त्याचा समारोप झाला. हक्‍कासाठी आम्ही जे काही आंदोलन केले की, सरकार पण आमच्या बाजुने आहे, आणि न्यायदेवताही आमच्या बाजुने आहे. न्यायदेवता आमच्या बाजुने आहे, अशा प्रकारच्या भावना आमच्यामध्ये दृढ झाल्या. गुन्हे मागे घेतल्याने आम्हाला आनंद झाला, असे विश्‍वनाथ जाधव यांनी सांगितले.

आमदार बाळा भेगडे यांच्या प्रयत्नाचे यश शेतकऱ्यांबद्दलचा जिव्हाळा त्यांनी त्यांच्या पदाचा विचार न करता शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहिल्यामुळे हे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. हे गुन्हे मागे झाल्याने आम्ही सगळे शेतकरी आनंदात आहे, असे पांडुरंग ठाकर यांनी स्पष्ट केले.

किसन खैरे, म्हणाले की, शेतकऱ्यांना न्याय भेटला गुन्हे माफ झाल्यामुळे खूप आनंद झाला. पवनाबंद जलवाहिनीला विरोध कायमचे असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)