पवना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

पवनानगर : पवना धरणाच्या सांडव्यावरून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला.

पवनानगर – पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणाचे सहा दरवाजे उघडून पवना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शुक्रवारपासून (दि. 10) पवनाधरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला होता. पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने पवना धरणाचे सहा दरवाजे अर्धा फुटाने उघडले आहे.

दिवसभर पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी सांयकाळी चारनंतर हा विसर्ग वाढवुन धरणाचे सहाही दरवाजातून 2208 क्‍युसेक पाणी विसर्ग करण्यात आला, अशी माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता एम. एम. गदवाल यांनी दिली. पवना धरणात दिवसभरात 25 मिलीमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे, तर आजअखेर 2318 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवनाधरणाचे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास धरणाच्या चार दरवाजे उघडून 1500 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होत. काल दुपारी एकच्या सुमारास 800 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले होते; परंतु परिसरात रात्रभर पावसाची रिमझिम जोर धरू लागला. आज दिवसभर पाऊसाचे प्रमाण वाढल्याने दुपारी चारच्या सुमारास 2208 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)