पवना नदी घाटावर अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह

वडगाव मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्‍यातील बेबडओव्हळ गावाजवळ पवना नदी घाटावर एका अनोळखी ज्येष्ठ व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवार (दि.20) उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबडओव्हळ गावाजवळ पवना नदीमध्ये अनोळखी व्यक्ती अंदाजे 60 ते 66 वर्ष वय असलेला मृतदेह आढळल्याची माहिती चक्रधर एकनाथ घारे (वय 38, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ, पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या नाका तोंडातून फेस आला होता. संपूर्ण शरीर थंड पडले होते. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. तळेगाव दाभाडे पोलीस करीत तपास आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)