पवना नदीवरील घाटाच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन

सोमाटणे –शिरगाव येथील पवना नदीवर घाटाच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन सरपंच मंगल गोपाळे, उपसरपंच वंदना गोपाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी गोपाळे, कांताबाई अरगडे, अमोल गोपाळे, मारुती गोपाळे, केदार वाघमारे, श्वेता गोपाळे, निशा अरगडे, अमित ठोकळे, ग्रामसेवक चंद्रकांत मोरे, भानुदास गोपाळे, सुरेश गोपाळे, लता गायकवाड, वैशाली येवले, सुखदेव गोपाळे, संतोष मरगळे, ठेकेदार बाळा जगताप आदी उपस्थित होते.
शिरगाव जवळून वाहत असलेल्या पवना नदीच्या तीरावर स्मशान भूमीच्या शेजारी असलेल्या घाटाची दुरवस्था झाली आहे. याठिकाणी गावातील महिला कपडे धुण्यासाठी येत असतात. तसेच येथे स्मशानभूमी असल्याने अंत्यविधी व दशक्रिया विधी साठी आलेल्या लोकांना नदी पात्रात उतरून पाणी घेता यावे यासाठी घाटाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या कामासाठी सुमारे 6 लाख 30 हजार रुपये खर्च अपेक्षित असून सदर कामासाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या फंडातून 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर उर्वरित रक्कम ही ग्रामपंचायत फंडातून टाकण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच वंदना गोपाळे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)