पवना नगर परिसरात राम नवमी उत्साहात साजरी

पवना नगर – पवना नगर परिसरामध्ये विविध कार्यक्रमांनी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महागाव येथील प्रभाचीवाडी येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह झाला. गावात सप्ताहाची 21 वर्षाची पंरपरा असून 18 मार्च ते 25 मार्च या कालावधीत अखंड तुलसी रामायणाचे आयोजन केले होते. दैनंदिन कार्यक्रमात काकडा आरती, गाथा भजन, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, महाप्रसाद व भंडारा झाला. यावेळी गीत रामायणाचा कार्यक्रम झाला. राम नवमीला सकाळी 10 ते 12 मराठवाडा भूषण रामायणाचार्य उध्दव महाराज चोले यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन झाले.

महागाव, पवना नगर, काले, कडधे, ब्राम्हणोली, कोथुर्णे, आंबेगाव, ठाकुरसाई परिसरातील महिला, नागरीक, लहान मुले, वृध्द नागरिकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सभापती गुलाबराव म्हाळसकर, पांडुरंग ठाकर, एकनाथ ठिळे, रघुनाथ लोहोर, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पंचायत समिती सदस्या जिजाबाई पोटफोडे, गुलाबराव वरघडे, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक विजय लांडे, विनोद मालू, खंडुजी तिकोणे, बाळासाहेब जाधव, सरपंच सुरेखा जाधव, उपसरपंच रामदास घारे यावेळी उपस्थित होते.

चावसर येथे रामजन्म उत्साहात
चावसर येथे 22 ते 25 मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. दररोज काकड आरती, गाथा भजन, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ झाला. बबन धनवे, गुलाब घारे, शंकर काळे यांचे प्रवचन व गणेश भोते, शाम फाळके, गबळु घारे यांनी कीर्तनसेवा केली. रविवारी सकाळी 10 ते 12 विठ्ठल महाराज पांडे यांचे रामजन्म व काल्याचे कीर्तन झाले. तुंग, मोरवे, शिळींब, अजिवली, वाघेश्वर, कोळे चाफेसर येथील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)