पवना नगर – पहिल्याच वर्षी बारावीच्या पवना नगर केंद्राचा निकाल 90 टक्‍के लागला. येथील विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी 40 किलो मीटरवरील तळेगाव अथवा लोणावळा येथे जावे लागत होते. त्यामुळे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक

मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, सचिव संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका प्रिती जंगले, पांडुरंग ठाकर, वैशाली पाटील, भारत काळे यांच्या प्रयत्नातून बारावी परिक्षा केंद्र सुरू केले. यंदाचे हे पहिलेच वर्ष होते. चार कॉलेजमधील 241 विद्यार्थ्यांनी या केंद्रासर परिक्षा दिली. पहिल्या तीन क्रमांकावर मुली आल्या. पवना ज्युनिअर कॉलेजची कला शाखेची विद्यार्थीनी वैशाली आंबादास पांचाळ 85.07 टक्के गुण मिळवून प्रथम, कै. सरुबाई पांडुरंग दळवी ज्युनिअर कॉलेजची प्रियंका ज्ञानेश्वर दळवी 84.46 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर पवना कॉलेजची वाणिज्य शाखेची मोनाली वसंत शिर्के 84.30 टक्‍के गुण मिळवून तृतीय आली.

कॉलेजचे निकाल पुढील प्रमाणे –
लायन्स शाता मानेक पवना ज्युनिअर कॉलेज, पवना नगर – 85 टक्‍के.
वाणिज्य विभाग- 92 टक्‍के.
1) शिर्के मोनाली वसंत- 84.30 टक्‍के.
2) तुपे उर्मिला बाबुराव- 75.53 टक्‍के.
3) तुपे दामिनी अरूण- 74.92 टक्‍के.
कला विभाग- निकाल 57 टक्‍के.
1) पांचाळ वैशाली आंबादास- 85.07 टक्‍के.
2) पांचाळ मनिषा आंबादास- 67.23 टक्‍के.
3) शिंदे प्रिती बाळु- 62.76 टक्‍के.
कै. सरूबाई पांडुरंग दळवी ज्युनिअर कॉलेज, कोथुर्णे – 88.8 टक्‍के.
1) प्रियंका ज्ञानेश्वर दळवी- 84.46 टक्‍के.
2) धनश्री मारूती खैरे- 79.53 टक्‍के.
3) प्रिती चंद्रकांत नढे- 76 टक्‍के.
श्री.छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज, कान्हे – 88.57 टक्‍के.
1) येवले कोमल अशोक – 78.80 टक्‍के.
2) साबळे मंगेश राजेश- 76.30 टक्‍के.
3) काकरे प्रियंका कैलास- 75.50 टक्‍के.
स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, शिवणे – 98 टक्‍के.
1) घारे पुनम ज्ञानेश्वर- 82.61 टक्‍के.
2) काळे ऋतुजा सुनिल- 77.53 टक्‍के.
3) आरूठे सुजाता तुकाराम- 76.30 टक्‍के.
3) टिळे तनुजा तानाजी- 76.30 टक्‍के.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)