पवना धरण 100 टक्‍के भरले

मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिचंवडकरांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला

पवनानगर – मावळसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरणातील पाणीसाठा 100 टक्‍के झाला आहे. दरवर्षी 15 ऑगस्टपर्यंत भरणारे पवना धरण या वर्षी लवकर भरले आहे.

पवनाधरण आज (रविवारी) 100 टक्‍के भरले. त्यानुसार शहराची पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे. यावर्षी जुलै महिन्यातच पावसाने वर्षभराची सरासरी ओलांडली होती. त्यामुळे यावर्षी पवना धरणामध्ये पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.

गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने काल दिवसभरात पावसाचा जोर वाढल्याने धरणसाठा 100 टक्‍के झाला. धरण परिसरात 1 जूनपासून 2 हजार 212 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती शाखाधिकारी ए. एम. गदवाल यांनी दिली. धरणात सध्या 8.512 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा आहे. धरण भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)