पवना धरण 100 टक्के भरले

वर्षेभरची चिंता मिटली ः पिंपरी-चिंचवडकरांना मिळाला दिलासा

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे. यामुळे शहराचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्‍न मिटला असून, पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या पवना धरणात 8.512 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. अशी माहिती जपसंपदा विभागाचे अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरावर उन्हाळ्यात पाणी कपातीचे जलसंकट ओढवले होते. जून महिन्यात पवना धरण कार्यक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाणी साठा जलद गतीने वाढत होता. शनिवारी (दि. 12) दिवसभरात झालेल्या 27 मि.मी. पावसाने पवना धरणसाठा 100 टक्‍यांवर पोहोचला आहे. पवना धरण परिसरात 1 जूनपासून आतापर्यंत 2 हजार 437 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र, धरण परिसरात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर वाढल्याने हैड्रोगेटद्वारे 1 हजार 459.19 क्‍युसेक पाणी पवना नदीत सोडण्यात आले होते.

गेल्या वर्षी देखील पवना धरण ऑगस्ट महिन्यात भरले होते. यंदाही पाऊस चांगला झाल्याने धरण वेळेत भरले आहे. परंतू, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली असून, धरण भरले शहरवासीयांना निश्‍चित आनंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)