पवनानगर: पवना धरण शंभर टक्‍के भरले असून, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी मंगळवारी जलपूजन केले. यावेळी महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शंभर टक्‍के पाणीसाठा : महापौर जाधव यांची उपस्थिती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षभर शहरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पवना धरणाची पाहणी मंगळवारी महापौर राहुल जाधव यांनी केली. त्यावेळी पवना धरणावर जलपूजन त्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे आयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, विशाल कांबळे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मनोहर खाडे उपस्थित होते. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. पवना धरण शंभर टक्के भरल्याने पिंपरी- चिंचवड शहराच्या पिण्याच्या पाण्यासह मावळातील शेतीच्या पाणी प्रश्न मिटला आहे. सध्यस्थितीत पवना धरणातील उपयुक्‍त जलसाठा 9.60 टीएमसी आहे. पवना धरण परिसरात एक जूनपासून दोन हजार 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)