पवना धरणात आढळला अॅलीगेटर मासा

कामशेत – पवन मावळातील पवना धरणात दूर्मिळ व माणसासह धरणातील अन्य माशांना घातक असलेला अॅलीगेटर मासा मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला आहे. या माशाचे तोंड मगरी सारखे असून, मागील भाग माशासारखा आहे. प्रथम या माशाला पाहून मच्छिमार घाबरले. मात्र हा मासा मृत असल्याची खात्री झाल्याने त्यांनी त्याला घरी आणले. सध्या हा मासा कामशेतमध्ये कुतूहलाचा विषय झाला. हा मासा पाहण्यासाठी स्थानिक गर्दी करीत आहेत.तर जलचरांसाठी तसेच माणसादेखील धोकादायक असलेला हा मासा धरणात आला कसा असा प्रश्न तज्ञांना पडला आहे.

पवना धरणामध्ये महेश तारू यांनी मंगळवारी (दि. 25) जाळे लावले. बुधवारी ते काढण्यासाठी गेले असता जाळ्यात त्यांना दूर्मिळ तीन किलोचा गार प्रजातीचा अलिगेटर मासा दिसला. या माशाचे तोंड मगरी सारखे तीक्ष्ण, दात, जीभ, पाठीचा भाग तीव्र टणक, डोळे, नाकपुड्या आदी असल्याने सुरुवातीला ती मगर असल्याचे त्यांना वाटले. मात्र हा मासा त्यांनी निरखून पहिला असता हा वेगळाच व दूर्मिळ मासा असल्याने आणि हा आपल्या भागात मिळत नसल्याने त्यांनी उत्सुकतेपोटी घरी आणला.

या माशाविषयी माहिती घेतली, हा गार प्रजातीचा अलिगेटर नावाचा मासा असून, त्याचे अस्तित्व लाखो वर्षांपूर्वीपासून असल्याचे कळते. हा मासा हिंस्त्र व मांसाहारी असून, माणसांवर देखील हल्ला करतो. विशेष म्हणजे याला मगरी सारखे तोंड आहे, तर तोंडाच्या मागील भाग माशासारखा आहे. हा मासा पाण्यातील इतर जलचरांना आपले भक्ष्य बनवतो. जलचर प्राण्याला तो हल्ला करून सहज शिकार करतो. या माशाची लांबी साधारण दहा फूटापर्यंत वाढत असून, वजन शंभर किलोच्या पुढे होत असते.

पवना धरणात आढळलेला मासा हा अजून, लहान असल्याने त्यांची आणखी किती संख्या या धरणात आहे, हा मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. भारतात ही प्रजाती दुर्मिळ असून, 2015 मध्ये आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये या प्रजातीने धुमाकूळ माजवला होता. तर काही वर्षांपूर्वी हा मासा दादरमध्ये आढळण्याने या प्रजातीचे मासे अजून, असल्यास अन्य जलचरासाठी धोकादायक ठरू शकत असल्याने भारतीय जीवशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी येथे विशेष सर्वे केला होता. प्रामुख्याने हा मासा नॉर्थ अमेरिकामध्ये पहावयास मिळतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)