पवना धरणातून 5970 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग

सतर्कतेचा इशारा: अनेक ठिकाणांचा संपर्क तुटला

पिंपरी – पवना धऱण परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्याने धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभरात 40 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तर आज अखेर 2575 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रात्रीपासुन पाण्याचा विसर्ग वाढविला असून धरणातुन 5,970 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आल्याने शिवली पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचड शहरातील नदीपात्रालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना सांडव्याचे सहा दरवाजे अर्धा फूट उचलण्यात आले असून, सांडव्यातुन 2,208 क्‍युसकने पाणी सोडण्यात सुरूवात केली होती. त्यानंतरही पावसाचे प्रमाण वाढत गेल्याने पुन्हा पवना नदीतील पॉवर हाऊसने 1400 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. परंतु दिवसभरामध्ये पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी (दि.26) पवना धरण परिसरामध्ये 140 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाल्याने काल सांडव्यातुन 4,570 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले.

त्यामुळे पावर हाऊसने 1400 व सांडव्यातुन 4570 असे एकुन 5970 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शिवली पुल पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरातील काही गावांचा पवनानगरशी संपर्क तुटला आहे. शिवली पुलावरून पाणी गेल्याने शिवली, भडवली, येलघोल धनगव्हाण, खडकवाडी व काटेवाडी या गावांचा पवनानगरशी संपर्क तुटला आहे त्यांना शिवली ते ब्राह्मणोली ह्या मोठ्या पुलावरून पवनानगरकडे यावे लागते.

या भागात दुग्ध व्यवसायांची संख्या अधिक आहे. त्यांना सकाळी सात वाजता दुध संकलन करण्यासाठी पवनानगर येथे यावे लागते त्यामुळे त्यांना सकाळी ब्राम्हणोली मार्गे अथवा कडधे मार्गी पवनानगर किंवा कामशेतला जावे लागत आहे. तर कोथुर्णे पुलाला कठड्यालगत पाणी आले असून येथील स्मशानभुमी पाण्याखाली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)