पवना धरणाच्या सांडव्यावरुन 800 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

पवनानगर – मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहराचे पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण 100 टक्‍के भरले आहे. मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहराला वरदान ठरलेले पवना धरणाचा पाणीसाठा 100 टक्‍के झाला आहे. धरणाचे दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून त्यामधुन 800 क्‍युसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

पवना धरणात मे महिन्याच्या अखेर 18 टक्‍के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. धरण परिसरात 1 जूनपासून दोन हजार 265 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या वेळी दोन हजार 362 मि.मी. एवढा पाऊस झालेला होता. आजमितीस 100 मि.मी. इतका फरक पडला असला तरी चिंता करण्यासारखे कारण नाही. पवना धरण 100 टक्‍के भरलेले आहे, अशी माहिती शाखा अधिकारी ए. एम. गदवाल यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवना धरणामध्ये 241 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्‍त पाणीसाठा आहे. यावर्षी पवना धरण लवकर भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवना धरणाच्या विजनिर्मिती केंद्रात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दैंनदिन पिण्यासाठी पाण्याची मागणी असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सांडव्यावरुन पाणी सोडण्यात आले आहे, हे पाणी सहा तासानंतर बंद करण्यात येईल, अशी माहिती गदवाल यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)