पवना धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट

  • उन्हाच्या झळा : 39.92 टक्‍के पाणीसाठा

पवनानगर – मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. उन्हाची वाढती तीव्रता पाहता गेल्या दहा दिवसांत चार टक्‍के पाणीसाठा कमी झाला आहे. आजमितीला धरणात 39.92 टक्के पाणीसाठा असून, जूनपर्यंत पुरेल एवढा हा साठा शिल्लक आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. आजमितीला पवना धरणात 39.92 टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी 39 टक्के पाणीसाठा होता. हा पाणीसाठा जूनपर्यंत पुरेल एवढा आहे. गेल्या दहा दिवसांत धरणातील चार टक्के पाणीसाठा कमी झाला आहे.

पावसाळा दीड ते दोन महिन्यांवर आहे. मात्र, धरणात 39.92 टक्के पाणीसाठा असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. 31 मार्च रोजी धरणात सुमारे 48 टक्‍के पाणी साठा होता. गेल्या 22 दिवसांमध्ये पाणी साठ्यात दहा टक्‍क्‍यांची घट झाली आहे. पावसाळा सुरु होण्यास जवळपास 50 दिवस बाकी आहेत. पावसाळा लांबल्यास मात्र पाणी टंचाई होऊ शकते. पाटबंधारे खात्याकडून वर्षभरात शहराला धरणातून 4.84 टीएमसी पाणी दिले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर वाढला आहे. यावर्षी शहराने निश्‍चित केलेल्या कोट्यापेक्षा 0.5 टीएमसी म्हणजे जवळपास दहा टक्‍के पाणी अधिक उचलले आहे.

आजमितीला पवना धरणात 39.92 टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी 39 टक्के पाणीसाठा होता. हा पाणीसाठा जूनपर्यंत पुरेल एवढा आहे. तीव्र उन्हामुळे पाणी साठ्यामध्ये कमालीची घट होत झाली असून, गेल्या दहा दिवसांत चार टक्‍के पाणीसाठा कमी झाला आहे. पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी पाणीकपात करणे आवश्‍यक आहे.
– मनोहर खाडे, शाखा अभियंता, पवनाधरण.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)