पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे सादरीकरण

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. मेसर्स एचसीपी डिजाईन प्लॅनिंग ऍण्ड मॅनेजमेंट प्रा.लि.च्या वतीने हे सादरीकरण करण्यात आले. त्याकरिता केलेल्या दोन्ही नद्याच्या विविध ठिकाणच्या सर्वेक्षणाची माहिती या सादरीकरणातून देण्यात आली.
शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीचच्या प्रदुषणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्याकरिता महापालिकेने पुढाकर घेतला असून, या दोन्ही नद्यांना मोकळा श्‍वास घेण्यासाठी अपेक्षित उपाययोजनांची चाचपणी करण्यासाठी मेसर्स एचसीपी डिजाईन प्लॅनिंग ऍण्ड मॅनेजमेंट प्रा.लि. या ठेकेदार संस्थेची जून 2018 मध्ये नेमणूक केली आहे. त्यानंतर या संस्थेच्या वतीने दोन्ही नद्यांबाबत विविध ठिकाणची पाहणी करण्यात आली. त्यानुसारया संस्थेने पवना व इंद्रायणी नदीपात्राचा पूर्ण सर्व्हे करुन नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी मिसळणारे सांडपाणी, बांधकामाचा राडारोडा टाकून केले जाणारे अनाधिकृत भराव व त्यामुळे अरुंद होणारे नदी पात्र याबाबतच्या बाबींचा अभ्यास पूर्ण केला आहे. त्याचप्रमाणे नदीच्या दोन्ही काठावर असणाऱ्या खाजगी व सरकारी जमीनीचा सर्व्हे करुन त्याचे लॅन्ड रेकॉर्ड बाबतची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार या माहितीचे सादरीकरण करण्यात आले.

चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथे पार पडलेल्या सादरकरनाला महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक सचिन चिखले, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सागर आंगोळकर, संदिप वाघेरे, मोरेश्‍वर शेडगे, नामदेव ढाके, विठ्ठलनाना काटे, नगरसेविका सिमा सावळे, आशा शेंडगे, करुणा चिंचवडे, सिमा चौगुले तसेच शहरातील स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी, रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडी यांचे प्रतिनिधी, जिवीत नदी, जलबिरादरी, पीसीसीएफ, देवराई फौंउंडेशन, ईसीए, आर्ट ऑफ लिव्हींग, अशा विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरुवातीला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्पा बाबत प्राथमिक माहिती दिली. तसेच ही बैठक शहरातील पर्यावरणप्रेमी, नागरिक व स्वंयसेवी संस्थांच्या बरोबर नदीप्रकल्पा बाबत संवाद साधण्यासाठी आयोजित केल्याचे स्पष्ट केले. या सर्वांनी नदी सुधारबाबत असणाऱ्या संकल्पना व अपेक्षा याबाबत मत देण्याचे आवाहन केले.

संस्थेचे प्रतिनिधी कुणाल पटेल व गणेश आहिरे यांनी आत्तापर्यंत झालेल्या कामाचे सादरीकरण केले. महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर हाती घेऊन पर्यावरणपूरक पध्दतीने पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्‍त संतोष पाटील, दिलीप गावडे, सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या दोन्ही नद्यांबाबत अजून काही सुचना करावयाच्या आहेत त्यांनी येत्या आठवडाभरात महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या environment@pcmcindia.gov.in या ईमेलवर लेखी स्वरुपात सुचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)