‘पवना’, “इंद्रायणी’चा आराखडा तयार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या पवना व इंद्रायणी या दोन नद्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्यासाठी गुजरात येथील साबरमती नदीच्या सुधार प्रकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरण पदाधिकाऱ्यांसमोर बुधवारी (दि. 24) करण्यात आले.

नदी सुधार प्रकल्पासाठी महापालिकेने मे. एचएसपी डेव्हलपमेंट ऍन्ड मॅनेजमेंट कन्सलटंट या सल्लागार संस्थेची नेमणूक केली होती. अहमदाबाद येथील साबरमती रिव्हर फ्रंन्ट प्रकल्पाचे काम या संस्थेने केले आहे. त्याच धर्तीवर पवना, इंद्रायणी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार झाल्यानंतर त्याचे प्राथमिक सादरीकरण पदाधिकाऱ्यांपुढे करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी या बैठकीला उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प पिंपरी महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्प केवळ चर्चेत होता अखेर त्याला मूर्त रुप मिळाले असून नदी सुधार प्रकल्पासाठी पवना, इंद्रायणी नद्यांचा सर्वे झाला आहे. त्यात भराव टाकलेली ठिकाणे, पात्रालगतची गॅरेज, हॉटेल व बांधकामांची माहिती संकलित केली आहे. तर, थेट नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, नाल्यांची माहिती घेतली आहे. निळी व लाल पूररेषा विचारात घेऊन नद्यांचा विकास केला जाईल. त्यासाठी महसूल विभागाकडून नदी पात्राची माहिती, नकाशे मिळविण्यात आले आहेत. प्रकल्पात इंद्रायणी नदीचा पहिल्या टप्प्यात तळवडे ते चिखलीदरम्यान प्रस्तावित डीअर पार्कचा परिसर, तसेच आळंदी ते चऱ्होलीदरम्यानचा हरित पट्टा विकसित केला जाणार आहे. तसेच, पवना नदीवरील केजुबाई बंधाऱ्याजवळ, नाशिकफाटा ते पिंपळे गुरव आणि दापोडी येथील परिसर विकसित केला जाईल. टप्प्या-टप्प्याने या दोन्ही नद्या विकसित केल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)